Sunday, April 5, 2015

Truth from the Chaff

संपादक लोकसत्ता
"दांभिक विरुद्द दुष्ट " हा आपल्या अग्रलेखाचा मथळा वाचून खूप खेद वाटला . त्याचे मुख्य कारण हे की हा लेख फार उथळ वाटला . एक तर तो चुकीच्या माहितीच्या आधारावर लिहिला आहे. गुल्बेर्ग सोसायटी स्माराकासंबाधी तक्रार फर्जी कागदावर केली होती आणि त्या सोसायटी ने त्या बद्धल पोलिसांना लिहेले होते. पोलिसांनी त्या कडे पूर्ण दुर्लक्ष्य केले आणि खोट्या तक्रारीवर आपला  तपास चालू केला . त्या स्मारकासाठी तीन वर्षात फक्त . लाख निधी गोळा झाला ( आपण चुकीची रक्कम कोटी ४० लाख अशी दिली आहे. ही पूर्ण रक्कम २००३ ते २०१४ च्या काळातील पूर्ण निधी आहे. फत्क स्मारकासाठी नाही ) आणि म्हणून स्मारक रद्द केले . ज्या लोकांनी हा  निधी दिला होता त्याच्या सामंतीने सोसायटीला तसे कळवले गेले. जमा झालेले . लाख आज सुद्धा तसेच आहेत. तिस्ता यांच्या  संस्थे चे हिसाब गेली दहा हून अधिक वर्षे दर वर्षी आयकर भवन , च्यारीटी कमिशनर , एच डि मिनिस्ट्री , औडीटोर आणि देणगी देण्याऱ्या  संस्था तपासात आल्या आहेत त्यांना काही चूक मिळाली नाही पण पोलिसांना ख्योटया  तक्रारीच्या आधारावर  ( सगळे कागद  पत्र मिळाल्यानंतर सुद्धा ) तिस्ता यांची पोलिस कस्टडी हवी होती .   गुजरात मधील न्यायासाठी संघर्ष करणारी जनता आणि तिस्ता यांची संस्था यांच्या प्रयत्नाने   गुजरात मधील   नरसंहारा विरुद्ध आज पर्यंत १२६ जणांना कायद्याने सजा झाली आहे. त्या मध्ये माया कोद्नानी सारखे गुजरातचे मंत्री पण सामील आहेतभारताच्या इतिहासात असे उदाहरण मिळणार नाही . पोलिसांनी हा गुन्हा फक्त  तिस्ता आणि जावेद विरुद्ध नाही पण एहसान जाफरी यांच्या मुलाविरुद्ध पण केला आहे. ह्याची  एक महत्वाची  बाजू म्हणजे एहसान जाफरीच्या  पत्नीने त्या वेळच्या मुख्यमंत्री मोदींच्या विरुद्ध तक्रार केली आहे. आपण तिस्ता दांभिक कुठच्या  आधारावर म्हणत आहात ? कि हा पूर्व ग्रह आहे ?
हातात लेखणी आली कि त्या बरोबर जबाबदारी पण येते, हे आपल्या सारख्या बुजुर्ग संपादकांना सांगावे लागणे ही लाजे ची गोष्ट आहे. एका अर्थाने आपण तिस्ता यांचे चरित्र हनन केले आहे.
संध्या गोखले


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.